योजना - मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना / MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA

tmsjob TMSJOB
0

 

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

 

मुख्यमंत्री
सौर कृषीपंप योजना

राज्यात 'अटल' सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार आहेत.
पहिला टप्पा २५००० नग
दुसरा टप्पा ५०००० नग
तितिसरा टप्पा २५००० नग

योजनेची ठळक वैशिष्टे

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (३ व ५ अश्वशक्ती ) :

शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.

पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.

५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्ती सौर कृषीपंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.

यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.

अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.

वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.

धडक सिंचन योजनाअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता:

विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.

खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.२ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.

कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

 

 

लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.

5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.

राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी

विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.

अतिदुर्गम भागातील शेतकरी.

महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.

सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.

अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.

या योजनेत खालीलप्रमाणे नविन तसेच प्रलंबित अर्जदार पात्र राहतील

पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च 2018 पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये 2.5 लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.

31.03.2018 नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार.

01.01.2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार.

2.5 लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

1) 7/12 उतारा प्रत

2) आधार कार्ड

3) कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)

पैसे भरुन प्रलंबित वीजजोडणी ग्राहक : पारेषण विरहित सौर कृषि पंपाकरीता अर्ज करण्यासाठी

 

अर्ज भरण्यासाठी येथे किलिक करा

Website

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top